शुक्रवार, १७ मार्च, २०२३

Excel मध्ये Sum Formula कसे वापरावे? | 5 उदाहरण आणि सराव फाइलसह

Excel मध्ये Sum Formula कसे वापरावे? | 5 उदाहरण आणि सराव फाइलसह.



um Formula in Excel in Marathi – या आर्टिकल मध्ये आपण एक्सेल च्या खूप महत्त्वाच्या Sum Formula ला शिकणार आहे.


Sum Function काय आहे ? Sum Function चा यूज का आणि कधी केला पाहिजे? याला Examples सह या आर्टिकल मध्ये शिकणार आहे.

What is Sum formula in Excel In Marathi?

प्रथम समजून घेऊया कि Excel मध्ये Sum Formula काय आहे ?

जसे कि Sum Word चा Meaning असतो जोडणे म्हणजे एकापेक्षा  जास्त Numbers ला जोडणे.

त्याच प्रकारे, Excel मध्ये देखील Sum Formula चा वापर दोन पेक्षा अधिक नंबर ला जोडण्यासाठी केला जातो.

Sum Formula च्या मदतीने आपण आपल्या आवश्यक डेटा जसे सेलरी (Salary), एम्प्लॉईस (Employees) ची संख्या प्रॉडक्ट (Product) ची प्राइस (Price) इत्यादि खूप साऱ्या गोष्टी जोडू शकतो.


Why Sum Function is used in Excel in Marathi

Sum Function चा 
वापर का केला जातो ?

Sum Formula चा वापर जास्त तर नंबर ला जोडण्यासाठी केला जातो.

जेव्हा आपण एक्सेल च्या कोणत्या अश्या डेटा मध्ये काम करत असतो जिथे खूप जास्त Numbers आहेत आणि तुम्हाला काही Analysis करण्यासाठी त्या Numbers चा टोटल काढायचा असेल, तेव्हा तुम्ही Sum Formula चा वापर करू शकता.

Syntax of Sum Formula in Excel in Marathi

Sum Function चा Syntax काही या प्रकारे असतो.

=Sum(Number 1, Number 2, . . . . )

Number 1: Sum formula च्या syntax चे number 1 मध्ये खालील प्रकारे नंबर ला जोडला जाऊ शकतो.

  • Number: जर तुम्हाला नंबर चा वापर करत टोटल काढायची असेल तर इथे नंबर लिहा. जसे =sum(4,5,6)
  • Cell Reference: तुम्ही Cell Reference चा वापर करत त्या सेल मध्ये असलेल्या एकूण नंबर चा टोटल काढू शकता. =sum(A1,B2,C3)
  • Cell Range: तुम्ही सेल फॉर्मुला ( sum formula) मध्ये Cell Range चा पण वापर करून त्या रेंज मधील एकूण नंबर चा टोटल काढू शकता.

Number 2: इथे तुम्ही वेगळा नंबर ऍड करू शकता ज्याला तुम्हाला ऍड करायचे असतील तुम्ही याप्रमाणे सुमारे २५५ क्रमांक जोडू शकता.

Excel मध्ये डेटा ला जोडण्यासाठी ५ मार्ग | How Sum Formula is used?


आता आम्ही खालच्या Excel चा डेटा ला जोडण्यासाठी ५ वेग वेगळ्या मार्ग ला शिकणार आहे ज्याचा मदत ने आम्ही Excel मध्ये आपल्या डेटा ला जोडून त्याचा टोटल काढू शकतो.

Example 1: Simple way to Add Total in Excel in Marathi


सर्वप्रथम आपण कोणतीही संख्या सहज कशी जोडू शकतो हे सोप्या पद्धतीने समजून घेऊ.

तुम्ही खालील इमेजमध्ये पाहू शकता, आम्ही Employee चा डेटा त्यांच्या शहरात केलेल्या कामानुसार पाहत आहोत. आता आपल्या ला हे पाहायचे आहे प्रत्येक Employee ने टोटल किती काम केले आहे.


तर इथे आम्ही Ramesh चा कामा ची टोटल काढण्यासाठी =B2+C2+D2 चा वापर करता Cell Reference ला ऍड केले आहे ज्या मध्ये Ramesh चा द्वारे काम केले त्याची टोटल आम्हाला मिळते.

ह्याच प्रकारे तुम्ही Mukesh आणि Suresh चा डाटा पण टोटल करू शकतो.

Example 1 sum formula in excel in marathi
Example 1 sum formula in excel in marathi


Example 2 – Sum formula with numbers in Marathi

ह्या Example मध्ये आम्ही Sum formula सोबत नंबर चा वापर करता डेटा चा टोटल काढणार.

येथे देखील आम्हाला प्रत्येक Employee च्या सर्व शहरां मध्ये काम केलेल्या डेटा ची टोटल पाहिजे.

ही एक पद्धत आहे जिथे आपण Sum formula चा syntax च्या आत मध्ये एक एक करून सगळ्या नंबर ला coma(,) देऊन लिहणार.

आम्ही ते असे काहीतरी =sum(44,46,13) लिहू ज्याने रमेश द्वारे प्रत्येक शहरा मध्ये दिलेल्या कामा चे टोटल 103 मिळतील.

त्याचप्रमाणे Mukesh साठी आम्ही =sum(16,23,41) आणि Suresh साठी =Sum(38,35,17) वापरतो जे आपल्याला Mukesh चा टोटल ८० आणि Suresh चा टोटल ९० मिळेल.

Example 2 sum formula in excel in marathi
Example 2 sum formula in excel in marathi


Example 3 – Sum formula with Cell Reference in Marathi

ह्या Example मध्ये आम्ही Sum Formula चा Syntax मध्ये Cell Reference चा वापर करू.

इथेही आमची गरज सारखीच आहे, आम्हाला प्रत्येक Employee चे टोटल केलेल्या कामाची करायची आहे, परंतु येथे आम्ही syntax मध्ये cell Reference चा वापर करू.

आपण ते असे काहीतरी =SUM(B2,C2,D2) लिहू जेणेकरून आपल्याला Ramesh चा द्वारे प्रत्येक शहरा मध्ये दिलेल्या कामा चा टोटल 103 मिळतो.

त्याचप्रमाणे Mukesh साठी आम्ही =SUM(B3,C3,D3) आणि Suresh साठी =SUM(B4,C4,D4) वापरतो ज्यामुळे आम्हाला Mukesh चा टोटल ८० आणि Suresh चा टोटल 90 मिळतील.

Example 3 sum formula in excel in marathi


Example 4 – Sum formula with Cell Range in Marathi

आता आम्ही Sum Formula चा Cell Range मध्ये Sum Formula चा उपयोग करणार.

इथेही आमची गरज सारखीच आहे, आम्हाला प्रत्येक Employee चा टोटल केलेल्या कामे काढायची आहेत, पण आता इथे syntax मध्ये Cell Range वापरणार आहोत.

Cell Range चा वापर करण्यासाठी आम्हाला Sum Formula असे काहीतरी =SUM(B2:D2) लिहावे लागेल. त्यामुळे आम्ही Ramesh चा द्वारे प्रत्येक शहरा मध्ये दिलेल्या कामा चे टोटल 103 मिळतात.

ह्याच प्रकारे Mukesh साठी आम्ही=SUM(B3:D3) आणि Suresh साठी =SUM(B4:D4) वापरतो ज्यामुळे आम्हाला Mukesh चा टोटल ८० आणि सुरेश चा टोटल 90 मिळेल.

Example 4 sum formula in Excel in marathi
Example 4 sum formula in Excel in marathi

Example 5 – Sum formula with Two Range in Marathi

ह्या example मध्ये आम्ही एक वरून जास्त Cell Range चा वापर करू.

आता समजा आम्हाला सांगितले गेले आहे Mumbai आणि Chennai मध्ये केलेल्या टोटल कामांची लिस्ट काढा जसे कि खालील इमेज मध्ये हाइलाइट केले आहे.

तर अश्या कंडिशन मध्ये आमचा Sum Formula ह्या प्रकारे असणार =SUM(B2:B4,D2:D4)। ज्याने आम्हाला Mumbai आणि Chennai चे टोटल केलेले काम 169 मिळेल.

तुम्ही Sum formula मध्ये एक वरून जास्त Cell Range ला कॉमा ने वेगळे करून पण डेटा चा टोटल काढू शकतो.

Example 5 – sum formula in Excel in marathi

Excel मध्ये SUMIF फार्मूला कसा वापरायचा | एक्सेल टिप्स | मराठी ट्रिक्स

Excel मध्ये SUMIF फार्मूला कसा वापरायचा | एक्सेल टिप्स | मराठी ट्रिक्स






काय तुम्हाला पण SUMIF Formula in Excel in Marathi मध्ये शिकायचे आहे? 

जर होय, तर आता प्रतीक्षाची वेळ संपली आहे, कारण या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला SUMIF Formula in Excel in Marathi बद्दल डिटेल मध्ये प्रॅक्टिस फाइल सह माहिती देणार आहे. 

जर तुम्हाला पण SUMIF Formula in Excel in Marathi मध्ये शिकायचे आहे तर 

या आर्टिकल ला नक्की वाचा.

What is SUMIF formula in Excel In Marathi?

तर सर्वात पहिले समजूया कि Excel मध्ये SUMIF Formula काय आहे?

SUMIF Formula ला Excel मध्ये SUMIF Function पण म्हंटले जातात. 


हा एक्सेल चा एक खूप उपयोगी फॉर्मुला आहे याचा वापर आपण 
कोणत्याही कंडिशन (Condition or Criteria) च्या आधारा वर कोणत्याही डेटा च्या Sum म्हणजे Total काढण्यासाठी करतो.



Syntax of SUMIF Formula in Excel in Marathi

Excel मध्ये SUMIF Function चा Syntax अशा प्रकारा चे असतात.

=SUMIF(Range, Criteria, [Sum Range])

  • Range: त्या Range ज्यामध्ये Criteria लावायचे असतात.
  • Criteria: Criteria किंवा condition ज्याच्या आधारा वर SUM काढायचे इच्छुक आहात.
  • Sum range: त्या range ज्याच्या Data मधून Sum किंवा Total काढायचे इच्छुक आहात.

Note: जर Criteria Range आणि SUM Range दोन्ही Same म्हणजे एकच आहे तर अशा परिस्थितीत SUM Range ची आवश्यकता नाही आहे. जे तुम्ही खालील Example ३ मध्ये शिकाल.


SUMIF Formula in Excel in Marathi with 7 Examples

खाली आपण SUMIF Formula in Excel in Marathi च्या 7 विविध प्रकाराची Examples दिली आहेत ते शिकल्यानंतर प्रॅक्टिस साठी तुम्ही त्याची प्रैक्टिस फाइल पण डाउनलोड करू शकता.


Example 1: Text Criteria with SUMIF Formula in Excel in Marathi

चला मित्रांनो आता आपण SUMIF formula ला Examples च्या द्वारे समजून घेऊया. सर्वप्रथम आपण टेक्स्ट कंडिशन सह सोप्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करू.

समजा आपल्याकडे काही या प्रकारा चा डेटा आहे जसे तुम्हाला खालील इमेज मध्ये दिसत असेल , ज्यामध्ये Column A मध्ये Region लिहिलेले आहे आणि दुसऱ्या Column B मध्ये Sales दिले आहे.


आणि तुम्हाला विचारले आहे कि South Region चा Total Sales काढा.

आपला SUMIF चा फॉर्मुला काही =SUMIF(A1:A13,”South”,B1:B13) या प्रकार चा राहील आणि आपल्याला South Region चा Total Sales 2458 मिळेल.
  • Range: म्हणून सर्वप्रथम आपण SUMIF formula मध्ये त्या range (A1:A13) ला सिलेक्ट करणार ज्यामध्ये आपल्याला Condition लावायची आहे.
  • Criteria: आणि नंतर Criteria मध्ये "South" लिहणार.
  • SUM Range: Sum Range वरून South Region चा Total काढण्यासाठी Sales च्या Range (B1:B13) ला सिलेक्ट करणार.

एक गोष्ट लक्षात ठेवा की Excel मध्ये कोणत्याही Formula मध्ये आपण Text चा वापर करत आहोत ,तर ते आपण Double Inverted Comma मध्ये लिहणार आहे. जसे कि मी या फार्मूला मध्ये "South" ला लिहिले आहे.



SUMIF formula in excel in Marathi with text condition
SUMIF formula in excel in Marathi with text condition


Example 2: Number Criteria SUMIF Formula in Excel in Marathi

आता आपण SUMIF formula ला Number च्या कंडिशन सह  समजण्याचा प्रयत्न करू.

समजा 
आपल्याकडे काही असा डेटा आहे जसे तुम्हाला खालील इमेज मध्ये दिसत आहे ज्यामध्ये Column A मध्ये Year लिहिलेले आहे आणि दुसऱ्या Column B मध्ये Sales दिले आहे.

आणि तुम्हाला विचारले आहे कि year 2021 मध्ये केलेल्या Total Sales ला काढा.

ज्याच्यासाठी आपला SUMIF चा फॉर्मुला काही =SUMIF(A1:A13,2021,B1:B13) 
या प्रकार चा होईल. आणि आपल्याला Year 2021 मध्ये केलेल्या Total Sales 7478 मिळेल.

  • Range: म्हणून सर्वप्रथम आपण SUMIF formula मध्ये Criteria Range म्हणजे A1:A13 ला सिलेक्ट करणार.
  • Criteria: ज्यामध्ये आपण Condition म्हणजे 2021 ला लिहणार.
  • SUM Range: आणि नंतर Year २०२१ चा Total काढण्यासाठी Sales च्या Range म्हणजे B1:B13 ला सिलेक्ट करणार.

SUMIF formula in excel in Marathi with number condition
SUMIF formula in excel in Marathi with number condition

Example 3: Greater Than Criteria with SUMIF Formula in Excel in Marathi


आता आपण SUMIF formula ला greater than च्या कंडिशन सह  समजण्याचा प्रयत्न करू.

समजा असा काही डेटा आहे जसे तुम्हाला खाली दिलेल्या इमेज मध्ये दिसत आहे, ज्यामध्ये Column A मध्ये Year लिहिले आहे आणि दुसऱ्या Column B मध्ये Region आणि Column C मध्ये Sales देण्यात आले आहेत.

आणि तुम्हाला विचारले कि 500 पेक्षा जास्त Sales चा Total काढा .

तर या प्रकरणात आपण Greater Than sign> चा वापर करू.

इथे एक गोष्ट नोटीस करण्याची आहे कि ज्या Range मध्ये Condition लावायचे आहे आणि ज्या Range वरून Sum काढायचे आहे ते दोन्ही एकच आहे.

आणि आपला SUMIF चा फॉर्मुला काही =SUMIF(C1:C13,”>500″) किंवा =SUMIF(C1:C13,”>500″,C1:C13) या प्रकारे होईल. आणि आपल्याला 500 वरून जास्त केलेल्या Sales चा Total 9942 मिळेल.

  • Range: आपण SUMIF formula मध्ये सर्वात पहिले Range म्हणजे C1:C13 ला सिलेक्ट करणार.
  • Criteria: त्याच्यानंतर Condition मध्ये “>500” लिहणार कारण आपल्याला 500 वरून जास्त केलेल्या Sales ला काढायचे आहे.
  • SUM Range: आणि Sum range ला आपण लिहू किंवा नाही लिहू याने काही फरक नाही पडणार कारण Condition वाली Range आणि sum range दोन्ही एकच आहे.

SUMIF Formula with Greater Than in Excel in Marathi
SUMIF Formula with Greater Than in Excel in Marathi

Example 4: Less Than Criteria with SUMIF Formula in Excel in Marathi


मित्रांनो, आता आपण वर Greater Than condition ला पाहिले आहे, आता आपण Less Than च्या Condition ला त्याच Data वर समजूया.

वर 
आपल्याला 500 पेक्षा जास्त केलेल्या Sales चा Total काढण्यासाठी सांगितले होते आता आपल्याला इथे 1000 वरून कमी झालेल्या Sales चा Total काढण्यासाठी सांगितले आहे.

तर या प्रकरणात आपण Less Than Sign < चा वापर करू.

इथे पण 
आपल्याला ज्या Range मध्ये Condition लावायचे आहे आणि ज्या Range मधून Sum काढायचे आहे ते दोन्ही एकच आहे.


  • Range: तर अशा परिस्थिती मध्ये आपल्या SUMIF Formula मध्ये आपण सर्वात पहिले , Range म्हणजे C1:C13 ला सिलेक्ट करणार .
  • Criteria: त्यानंतर Condition मध्ये “< 1000” लिहू कारण आपल्याला 1000 पेक्षा कमी केलेल्या Sales ला काढून टाकायचे आहे.
  • Sum Range: आणि Sum Range ला आपण लिहू किंवा नाही लिहू याने काही फरक पडणार नाही कारण Condition वाली Range आणि Sum Range दोन्ही एकच आहे.

आणि आपला SUMIF चा फॉर्मुला काही SUMIF(C1:C13,”<1000″) किंवा =SUMIF(C1:C13,”<1000″,C1:C13) या प्रकारे होणार. आणि आपल्याला 1000 वरून कमी केलेल्या Sales चा Total 2925 मिळेल.

sumif formula in excel in Marathi with less than
sumif formula in excel in Marathi with less than


Example 5: Not Equal to Criteria with SUMIF Formula in Excel in Marathi


समजा तुमच्याकडे खालील डेटा आहे, ज्यावरून तुम्हाला West व्यतिरिक्त इतर जितके पण region आहे त्यांचा Total Sales काडून टाकण्यासाठी सांगितले ,तर हे कसे करायचे?

अशा कंडिशन मध्ये आपण not equal to <> चा वापर करणार आणि SUMIF चा फॉर्मुला काही =SUMIF(B1:B13,”<>West”,C1:C13) या प्रकारे लिहणार.

त्यानंतर आपल्याला West वगळता सर्व Region चे Total 8342 मिळतील.

  • Range: आपल्या SUMIF formula मध्ये आपण सर्वात पहिले Range म्हणजे B1:B13 ला सिलेक्ट करणार.
  • Criteria: त्यानंतर Criteria मध्ये “<>West” लिहू कारण आपल्याला West ला सोडून सर्व Region चे Total हवे आहेत. येथे <> म्हणजे not equal to असतात म्हणजेच बरोबर नाही आहे.
  • Sum Range: आणि SUM Range साठी आपण Sales चा Range C1:C13 ला सिलेक्ट करणार.


sumif formula in excel in marathi with not equal to condition
sumif formula in excel in marathi with not equal to condition     

Example 6: Date Criteria with SUMIF Formula in Excel in Marathi


आता आपण Date च्या कंडिशन च्या आधारा वर काही SUMIF चे Examples बघूया. खाली काही डेटा दिलेला आहे ज्यामध्ये Date आणि Region च्या आधारा वर केलेल्या Sales ची लिस्ट आहे.

आणि June महिन्या नंतर आणि पहिले केलेल्या Sales ला काढण्यासाठी सांगितले आहे, तर या बघूया हे कसे करू शकतो.

Example 1: After June Month Sales


सर्वात पहिले आम्ही June महिन्यानंतर केलेल्या Sales चा Total काढणार आणि आमचा फॉर्मुला काही =SUMIF(A1:A13,”>”&DATE(2021,6,30),C1:C13) 
या प्रकारे असणार.

ज्याने आपल्याला June महिन्यानंतर केलेल्या Sales चा Total 7440 मिळेल.

  • Range: इथे आपल्याला Date च्या Range A1:A13 ला सिलेक्ट करायचे आहे, कारण आपल्याला Criteria Date वरच लावायचे आहे.
  • Criteria: इथे आपल्याकडून After June Month चा डेटा काढण्यासाठी सांगितले आहे त्यासाठी आपण Criteria मध्ये “>”&Date(2021,6,30) लिहणार.

§  आता > greater than चा sign आहे जे दर्शवते की June महिन्या पासून मोठ्या महिन्या ला सिलेक्ट करायचे आहे.

§  आणि आपण जून महिन्या ला सिलेक्ट करण्यासाठी Date Formula चा वापर केला आहे. ज्यामध्ये Year = 2021, Month=6, आणि Date = 30 घेतले आहेत.

§  इथे आपण Date = 30 घेतली आहे कारण आपल्याला june च्या नंतर च्या महिन्या ची टोटल काढायची आहे आणि June महिन्या ची शेवट ची तारिक ३० असते.

  • Sum Range: आणि SUM Range साठी आपण Sales च्या Range C1:C13 सिलेक्ट करणार.

SUMIF Formula with Dates in Excel in marathi
SUMIF Formula with Dates in Excel in marathi

Example 2: Before June Month Sales


सर्व प्रथम, आपण June महिन्या पूर्वी केलेल्या Sales ला काढू . आणि आपला फॉर्मुला =SUMIF(A1:A13,"<"&DATE(2021,6,1),C1:C13) असे काहीतरी असेल.

ज्याने आपल्याला june महिन्याच्या आगोदर केलेल्या Sales ची  Total 3003 मिळेल.

  • Range: इथे आपल्याला date च्या range A1:A13 ला सिलेक्ट करावे लागेल, कारण आपल्याला Criteria date वरच लावायचे आहे.
  •  Criteria: इथे आपल्याला Before June Month चा डेटा काढण्यासाठी सांगितले आहे त्याच्यासाठी आपण criteria मध्ये “<“&Date(2021,6,1) लिहणार.
  • आता हे < Less than चा sign आहे जे दर्शिवते कि june महिन्या वरून मोठ्या महिन्याला सिलेक्ट करायचे आहे.
  • आणि आम्ही June महिन्याला सिलेक्ट करण्यासाठी Date formula चा वापर केला आहे. ज्यामध्ये Year = 2021,Month=6, आणि Date = 1 घेतले आहे.
  • इथे आपण Date=1 याच्यासाठी घेतली आहे कारण june महिन्या च्या नंतर ची तारिक १ असते.
  • Sum Range: आणि SUM Range साठी आपण Sales च्या  Range C1:C13 सिलेक्ट करणार.


लोकप्रिय पोस्ट