संगणक म्हणजे काय? संगणकाची मराठी माहिती | Computer Information in Marathi
Computer information in Marathi: आजच्या युगात संगणक अतिशय महत्वाचे साधन बनले आहे. शाळा कॉलेज, रुग्णालय, ऑफिस, प्रयोगशाळा इत्यादि प्रत्येक ठिकाणी संगणक वापरले जाते. आजच्या या आधुनिक युगात प्रत्येक व्यक्तीला संगणकाची माहिती असणे अतिशय आवश्यक आहे.
म्हणूनच या लेखात संगणक अर्थात कम्प्युटर ची मराठी माहिती देण्यात आली आहे. ही माहिती सर्व विद्यार्थ्यांसाठी फार उपयुक्त आहे तर चला सुरू करूया..
संगणकाची व्याख्या काय आहे? - Definition of Computer in Marathi
कॉम्प्युटर किंवा संगणक हे एक इलेक्ट्रॉनिक यंत्र आहे. जे माहिती साठवते, दिलेल्या माहितीचा निष्कर्ष काढते, माहितीवर प्रक्रिया करते. वेब ब्राउझिंग, ईमेल पाठवणे व खेळ खेळणे इत्यादी गोष्टींसाठी संगणकाचा वापर केला जातो.
संगणकाने ने मनुष्यबळाची आवश्यकता कमी केली आहे. संगणकाला इंग्रजी भाषेत कॉम्प्युटर (computer) म्हटले जाते. कॉम्प्युटर हे नाव लॅटिन शब्द computare पासून घेण्यात आला आहे. या शब्दाचा अर्थ calculation म्हणजेच हिशोब करणे असा होतो.
संगणकाची महत्वाची माहिती | Computer information in Marathi
कॉम्प्युटर मुख्यतः तीन कार्य करते पहिले म्हणजे माहिती किंवा डाटा ला स्वीकार करणे ज्याला input म्हटले जाते. दुसरे काम माहितीवर प्रक्रिया करणे. आणि शेवटचे काम प्रक्रिया केलेल्या महितीला दाखवणे ज्याला output म्हटले जाते.
आधुनिक संगणकाचे जनक चार्ल्स बॅबेज यांना म्हटले जाते. कारण त्यांनीच सर्वात आधी पहिले संगणक तयार केले होते. या संगणकात पंच कार्डद्वारे माहिती इनपुट केली जायची.
सुरुवातीच्या काळात संगणक हे फक्त माहिती साठवणे व त्यावर प्रक्रिया करण्यापुरतेच मर्यादित होते. परंतु आजचे संगणक अतिशय प्रगत बनले आहे. अंतरीक्ष, चित्रपट निर्माण, वाहतूक, उद्योग धंदे, रेल्वे स्टेशन, शाळा कॉलेज, एअरपोर्ट इ. जवळपास प्रत्येक ठिकाणी संगणकाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. computer information in marathi
कॉम्प्युटर चा फुल फॉर्म काय आहे? - Computer Fullform in Marathi
कॉम्प्युटरचा फुल फॉर्म पुढीलप्रमाणे आहे...
C: commonly O: operated M: machine P: particularly U: used for T: technical and E: educational R: research
कम्प्युटर चा फुल्लफॉर्म commonly operated machine particularly used for technical and educational research असा आहे.
संगणक म्हणजेच सामान्यत: वापरले जाणारे आणि विशेषतः तांत्रिक व शैक्षणिक संशोधनासाठी उपयोगात येणारे मशीन होय.
संगणकाचा इतिहास | Computer history information in Marathi
संगणकाचा शोध कोणी लावला?
तसे पाहता आधुनिक संगणकाच्या कार्यात बऱ्याच लोकांनी आपले योगदान दिले. परंतु या सर्वामध्ये महत्त्वाचे योगदान चार्ल्स बॅबेज (charles Babbage) यांनी दिले.
एकोणिसाव्या शतकात सन 1822 मध्ये त्यांनी पहिले मशीन बनवले. या मशीन चे नाव डिफरन्स इंजिन (difference engine) ठेवण्यात आले, या मशीन मध्ये गिअर आणि शाफ्ट लावले होते व हे मशीन वाफेने चालायचे.
सन 1833 मध्ये चार्ल्स बॅबेज यांनी difference engine चे विकसित रूप तयार केले या मशिनला analytical engine नाव देण्यात आले. आधीच्या मशीनच्या तुलनेत हे मशीन अधिक शक्तिशाली व प्रगत होते. यालाच प्रथम संगणक म्हटले जाते. charles Babbage यांनी सन 1833 मध्ये प्रथम संगणक तयार केले. संगणकाची माहिती
डॉ हॉवर्ड ऐकेंस मार्क 1
डॉ हॉवर्ड ऐकेंस सर यांनी IBM कंपनीच्या चार इंजिनियर सोबत मिळून सन 1944 मध्ये एक विकसित संगणक तयार केले. हे संगणक सर्वात पहिले 'विजेवर चालणारे' संगणक होते आणि याचे नाव automatic sequence controlled calculator असे ठेवण्यात आले. हे संगणक 6 सेकंदात 1 गुणाकार व 12 सेकंदात 1 भागाकार करायचे. computer information in marathi
ABC (atanasoff- berry computer)
सन 1945 मध्ये एटानासोफ व क्लिफॉर्ड बेरी यांनी मॅडम एक इलेक्ट्रॉनिक मशीन तयार केले याचे नाव ABC ठेवण्यात आले. ABC शब्द atansoff berry computer चे संक्षिप्त रूप आहे.
संगणकाचे प्रकार व संगणकाची माहिती - Types of computer in marathi
जेव्हा केव्हा आपण संगणकाचे नाव ऐकतो तेव्हा आपल्या मनात केवळ एक पर्सनल कॉम्प्युटर म्हणजेच डेस्कटॉप किंवा लॅपटॉप येते. परंतु computer वापरानुसार वेगवेगळ्या आकार व पद्धतीचे येतात. काही Types of computer in marathi पुढील प्रमाणे आहेत.
1) डेस्कटॉप (Dextop)
डेस्कटॉप कम्प्युटर चा उपयोग घर, शाळा, कॉलेज, ऑफिस इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणात केला जातो. या कॉम्प्युटर ला डेस्क म्हणजेच टेबलावर ठेवले जाते. याचे मॉनिटर, कीबोर्ड, माऊस, सीपीयू, प्रिंटर इत्यादी वेगवेगळे भाग असतात. या संगणकाला उपयोगात असताना पूर्णवेळ विद्युत पुरवठा लागतो व एका याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे कठीण असते.
2) लॅपटॉप (laptop)
दुसऱ्या प्रकारचे कॉम्प्युटर लॅपटॉप कॉम्प्युटर आहे. ज्याला जास्त करून लॅपटॉप म्हटले जाते. लॅपटॉप मध्ये कीबोर्ड, माऊस व सीपीयू आधीपासूनच येतात. लॅपटॉप बॅटरी वर कार्य करते व याचे वजन कमी असल्याने याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे सोपे असते.
3) टॅबलेट (tablet)
टॅबलेट ला hand held कॉम्प्युटर म्हटले जाते. कारण याचा आकार लहान असतो व याला तुम्ही आपल्या खिशात पण ठेवू शकतात. टॅबलेट मध्ये कीबोर्ड व माउस ऐवजी टच स्क्रीनचा वापर केला जातो. आयपॅड टॅबलेट चे एक उदाहरण आहे.
4) पामटॉप (palmtop)
पामटॉप एक प्रकारचे पोर्टेबल कॉम्प्युटर असते यालाच मोबाईल देखील म्हटले जाते. या कॉम्प्युटर ला आपण आपल्या हातात धरू शकतात. परंतु लॅपटॉप व कॉम्प्युटरच्या तुलनेत याची कार्य करण्याची क्षमता कमी असते.
संगणकाचे भाग - Parts of computer information in Marathi
Computer Information in Marathi : संगणकाला चालवण्यासाठी वेगवेगळे साधन उपयोगात घेतले जातात यांनाच संगणकाचे भाग किंवा parts of computer म्हटले जाते. संगणकाच्या भागांना दोन भागात विभागले जाते. 1) इनपुट उपकरणे 2) आउटपुट उपकरणे. संगणकाच्या काही महत्त्वाच्या भागांची माहिती पुढीलप्रमाणे आहे.
A] इनपुट उपकरणे (input devices)
संगणक वापरकर्ताद्वारे दिलेल्या इनपुट वर कार्य करते. संगणकाला इनपुट देण्यासाठी वेगवेगळे उपकरण वापरले जातात. काही इनपुट उपकरणांची माहिती पुढील प्रमाणे आहे.
1) माउस (mouse)
माउस हा संगणकात कर्सर कंट्रोल करतो. माउस च्या मदतीने संगणकात कोणतेही फोल्डर उघडणे, कॉपी पेस्ट करणे, डिलीट करणे इत्यादी कामे केली जातात.
2) कीबोर्ड (keyboard)
कीबोर्ड सुद्धा इनपुट उपकरण मध्ये शामिल आहे. कीबोर्ड वर वेगवेगळे बटन असतात. कीबोर्ड च्या मदतीने संगणकावर माहिती टाईप करणे तसेच इतर महत्त्वाचा डाटा संगणकाला पुरवला जातो.
3) स्कॅनर (scanner)
स्कॅनर डॉक्युमेंट स्कॅन करण्यासाठी वापरले जाते. स्कॅनर मध्ये स्कॅन करण्यात आलेल्या डॉक्युमेंट पासून पीडीएफ किंवा इमेज बनवता येते.
ऑनलाइन फॉर्म भरताना डॉक्युमेंट upload करण्याआधी स्कॅन केले जातात.
4) वेब कॅमेरा (Web camera)
वेब कॅमेरा चा उपयोग व्हिडिओ कॉल करताना केला जातो. वेब कॅमेर्याच्या मदतीने व्हिडिओ कॉल दरम्यान एकमेकांना पाहता येते. आजकाल लॅपटॉप मध्ये इनबिल्ट वेब कॅमेरे असतात.
5) मायक्रोफोन ( microphone)
मायक्रोफोन च्या मदतीने संगणकाला ऑडिओ इनपुट दिले जाते. गाणे रेकॉर्ड करण्यासाठी तसेच नेत्यांच्या रॅली मध्ये मायक्रोफोन चा वापर केला जातो. चांगल्या दर्जाचे मायक्रोफोन अतिशय महाग येतात.
B] आउटपुट उपकरणे (output devices)
आउटपुट प्रक्रियेत पुरवलेल्या माहितीला प्रोसेस करून दाखवले जाते. व हा डाटा दाखवण्यासाठी ज्या उपकरणांचा वापर केला जातो त्यांना आउटपुट उपकरणे किंवा output devices म्हटले जाते. काही आउटपुट उपकरणांची माहिती पुढीलप्रमाणे आहे. computer information in marathi
1) मॉनिटर (monitor)
मॉनिटर हे संगणकातील सर्वात महत्वाचे आउटपुट डिवाइस आहे. मॉनिटर हे टीव्ही प्रमाणे स्क्रीन च्या स्वरूपात असते. माऊस व कीबोर्ड च्या साह्याने संगणकाला देण्यात आलेले इनपुट मॉनिटरवर दिसते.
2) प्रिंटर (printer)
प्रिंटर च्या मदतीने संगणकात असलेल्या कोणत्याही डॉक्युमेंट्स ची प्रिंट काढता येते. प्रिंटर वेगवेगळ्या प्रकाराचे असतात. काही प्रिंटर लहान कागद प्रिंट साठी असतात तर काही मोठ्या कागदांसाठी. काही प्रिंटर ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट काढतात तर काही कलर प्रिंट काढतात.
3) स्पीकर (Speaker)
स्पीकर च्या मदतीने ऑडिओ आउटपुट ऐकायला येते. चित्रपटांची गाणी, भाषणे इत्यादी आवाज आपण स्पीकर द्वारे ऐकू शकतो.
सी पी यु माहिती मराठी | Cpu information in Marathi
सीपीयू हा संगणकातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. सीपीयू चा फुल फॉर्म पुढील प्रमाणे आहे.
CPU: Central processing unit
सीपीयू हा संगणकातील हार्डवेअर, सॉफ्टवेअर, यूजर, इनपुट, आउटपुट इत्यादी ठिकाणाहून मिळालेला डाटा जमवून ठेवतो. याशिवाय डेटा ला प्रोसेस करून परिणाम दाखवणे व संपूर्ण संगणकाचे कार्यभार सांभाळण्याचे काम सीपीयू करतो.
आज संगणक क्रांतीने आधुनिक युगात मोठे परिवर्तन घडून आणले आहे. संगणकाच्या मदतीने अनेक कठीण कार्य अतिशय कमी वेळात करणे शक्य झाले आहे. परंतु ज्याप्रमाणे संगणकाचे फायदे आहेत तसेच याचे काही दुष्परिणाम देखील आहेत संगणकाच्या मदतीने काही गुन्हेगार माहिती चोरून चुकीचा वापर करीत आहेत, म्हणूनच संगणक शाप की वरदान हे पूर्णपणे त्याच्या वापरकर्तावर अवलंबून आहे.
तर मित्रांनो ही होती संगणकाची माहिती - Computer information
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा