शुक्रवार, १७ मार्च, २०२३

मायक्रोसॉफ्ट एक्सेल मराठी माहिती | MS Excel Information in Marathi

मायक्रोसॉफ्ट एक्सेल मराठी माहिती | MS Excel Information in Marathi

https://t.me/+iYJ6ML29MDE5NzI1



जसे की, आपण जाणतोच संगणकाचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात टप्प्याटप्प्यावर होत असतो, त्यामुळे संगणक आपल्या जीवनात फार महत्त्वाचे असते. संगणक कार्य करत राहण्यासाठी अनेक घटक महत्वाचे ठरत असतात, त्यातीलच एक म्हणजे ऑपरेटिंग सिस्टिम होय. ऑपरेटिंग सिस्टिम ही संपूर्ण संगणक प्रणालीला कार्यरत राहण्यास मदत करते.

मायक्रोसोफ्ट विंडो ही संगणकामध्ये वापरली जाणारी जगातील सुप्रसिद्ध अशी ऑपरेटिंग सिस्टीम आहे. मायक्रोसोफ्ट विंडो या ऑपरेटिंग सिस्टिम मध्ये अनेक सॉफ्टवेअरचा समावेश होतो, त्यातीलच एक म्हणजे मायक्रोसोफ्ट एक्सेल होय. आता हे मायक्रो सॉफ्ट एक्सेल काय आहे, त्याचा वापर कुठे होतो, कसा होतो, का होतो, त्याचे वैशिष्ट्य काय, ही माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.


मायक्रोसोफ्ट एक्सेल म्हणजे काय ?

मायक्रोसॉफ्ट एक्सेल हे जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांच्या यादीत सामील असणाऱ्या मायक्रोसॉफ्टचे एक प्रॉडक्ट अथवा सॉफ्टवेअर आहे. याला MS Excel किंवा Excel या नावाने देखील ओळखले जाते. मायक्रोसोफ्ट एक्सेल मुळात एक स्प्रेडशीट प्रोग्राम आहे, ज्याचा उपयोग माहितीला ठराविक अनुक्रमे किंवा फॉरमॅटमध्ये मांडण्यासाठी केला जातो. एक्सेल बरोबरच मायक्रोसोफ्ट वर्ड, मायक्रोसोफ्ट कंपनीद्वारे तयार केलेले आणखी एक सॉफ्टवेअर आहे, word चा वापर देखील मोठ्या प्रमाणात डेटा एन्ट्री साठी केला जातो.

मायक्रोसोफ्ट एक्सेल वापरण्यात सुलभ आणि सोप्पे असल्यामुळे याचा उपयोग शैक्षणिक क्षेत्राबरोबरच, कॉर्पोरेट लेव्हलवर होतो, तसेच Accountant आणि ऑफिस कर्मचाऱ्यां द्वारे देखील केला जातो.



एक्सेल मध्ये आपण सूत्रांचा वापर करून माहिती ठराविक फॉर्मेट मध्ये सेट करू शकतो, यामुळे गणितीय आकडेमोड वेगाने आणि अचूक होण्यास मदत मिळते. या सूत्रांना सेव्ह करण्याची मुभा एक्सेल द्वारे वापरकर्त्याला दिली जाते, ज्यामुळे सूत्रे लक्षात ठेवण्याची गरज भासत नाही.

एकदा का आपण माहितीचा अनुक्रम एक्सेल मध्ये सेव्ह केला की, केवळ कॉपी पेस्ट करून देखील आपण माहिती ठराविक फॉरमॅट मध्ये इंटर करू शकतो.


मायक्रोसॉफ्ट एक्सेल चा इतिहास

मायक्रोसोफ्ट एक्सेलला सर्वप्रथम 1985 मध्ये जगप्रसिद्ध कंपनी मायक्रोसोफ्ट किंवा मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन द्वारे लॉन्च करण्यात आले होते.

लोटस 1-2-3 हे एक स्प्रेडशीट प्रोग्राम होते, जे लोटस डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या कंपनीद्वारे विकले होते. लोटस 1-2-3 हा स्प्रेडशीट प्रोग्राम MS-DOS या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालवले जात होते, आणि MS-DOS ऑपरेटिंग सिस्टिम, ही मायक्रोसॉफ्ट कंपनी व्दारे दुसऱ्या कंपनीला विकलेली ऑपरेटिंग सिस्टिम होती.


1980 च्या दरम्यान वैयक्तिक संगणकांमध्ये लोटस 1-2-3 या स्प्रेडशीट चा वापर वाढला, त्यामुळे संपूर्ण मार्केटमध्ये लोटस 1-2-3 ची मागणी देखील वाढली.

स्प्रेडशीट प्रोग्राम ची वाढलेली मागणी पाहता मायक्रोसॉफ्ट कंपनीने लोटस 1-2-3 चा प्रतिस्पर्धी तयार केला, ज्याचे नाव असेल Microsoft Excel ठेवण्यात आले.

मायक्रोसॉफ्टने पहिले एक्सेल चे वर्जन ॲपल कंपनीच्या Macintosh कम्प्युटर साठी तयार केले होते, एक्सेल चा काम करण्याचा वेग, यूजर फ्रेंडली इंटर्फेस आणि उत्तम ग्राफिक पाहता एक्सेल अगदी कमी वेळात लोकांमध्ये प्रसिद्ध झाले.

लोटस 1-2-3 हे एप्पल च्या Macintosh मध्ये चालण्यासाठी तत्पर नव्हते, त्यामुळे येथे मायक्रोसोफ्ट द्वारे बनवलेल्या एक्सेल साठी प्रतिस्पर्धी उरला नव्हता.

1987 मध्ये मायक्रोसोफ्ट एक्सेल चा नवीन वर्जन लॉन्च करण्यात आला, हे varsion मायक्रोसॉफ्ट विंडोजमध्ये चालण्यास सक्षम होते, यामध्ये देखील मायक्रोसॉफ्टने अगदी उत्तम ग्राफिक्सचा वापर केला होता, तसेच चा काम करण्याचा वेग देखील जास्त होता, याविरुद्ध लोटस 1-2-3 हे विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये कमी वेगाने चालायचे, तसेच लोटस चे ग्राफिक्स देखील इतके उत्तम नव्हते, त्यामुळे लोटस 1-2-3 ला मागे टाकत, मायक्रोसोफ्ट एक्सेल ने संपूर्ण मार्केट व्यापले, 1990 येता येता मायक्रोसोफ्ट एक्सेल मार्केट मधील प्रमुख स्प्रेडशीट प्रणाली बनले.

कालांतराने मायक्रोसॉफ्ट कंपनीद्वारे एक्सेल मध्ये अनेक प्रभावी बदल करण्यात आले, जसे की 3D चार्ट चा वापर, योग्य आऊटलाईन, टूलबार, शॉर्टकट की इत्यादी तसेच यापूर्वीच्या Excel च्या version पेक्षा अधिक सोपे बनवून लोकांपर्यंत पोहोचविले.

1995 दरम्यान मायक्रोसॉफ्ट द्वारे एक्सेल चे Excel-95 वर्जन तयार करण्यात आले, हे version 32 bit संगणकात चालण्यास सक्षम होते. या संगणकामध्ये intel 386 मायक्रोप्रोसेसरचा देखील वापर केला गेला होता.

1997 मध्ये Excel-97, 1999 मध्ये Excel-2000 असे एक्सेल चे नवीन वर्जन मायक्रोसॉफ्टने तयार केले.

कालांतराने मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनद्वारे एक्सेल मध्ये सुधारणा करण्यात आल्या, ज्यामुळे आज आपण इतक्या Well Develop Excel चा वापर आपल्या संगणकात करू शकत आहोत.

1 टिप्पणी:

लोकप्रिय पोस्ट